in

…त्यामुळेच राजीनामा दिला संजय राठोड यांचे स्पष्टीकरण

पूजा चव्हाण प्रकरणातून अखेर संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी राठोड भेट घेतली. राठोडांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राठोड यांनी माध्यमांसमोर येत राजीनामा देण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

“अनेक दिवसांपासून आमच्या बंजारा समाजातील तरुणी पूजा चव्हाण हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावरून विरोधी पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. माझी, माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकारणातून उठवण्याचाही प्रकारही झाला, मी माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे.”असं राठोड यांनी म्हटलं आहे. राजीनामा सुपूर्द केल्यानंतर संजय राठोड माध्यमांशी संवाद साधत होते.

“तीस वर्षात सामाजिक, राजकीय क्षेत्रात मी जे काम केलं आहे, ते उद्ध्वस्त करण्याचं काम झालं आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, हीच माझी मागणी आहे. याचा तपास व्हावा, अशीच माझी मागणी आहे. मी बाजूला राहून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी भूमिका आहे. सत्य बाहेर यावं. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे. त्यामुळेच मी राजीनामा दिला आहे,” असं स्पष्ट मत संजय राठोड यांनी मंडलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ म्हणाल्या…

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…