in

भाजपच्या दबावामुळे संजय राठोडांचा राजीनामा- पंकजा मुंडे

टिकटॅाक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत असलेले शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर आता भाजपच्या दबावामुळेचे संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी माहिती दिली. तसेच पूजा प्रकरणाची नि;पक्षपाती चौकशी व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

पूजा चव्हान प्रकरणात भाजपने राज्य सरकार विरोधात वादळ उठवत सबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानुसार काल संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. दरम्यान या प्रकरणात सत्ताधारी सरकार टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालत असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला. तसेच पूजा प्रकरणावरून राजकारण केले जाऊ नये. या प्रकरणाची नि;पक्षपाती चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चिपी विमानतळाच्या पाहणीसाठी संसदीय अंदाज समिती सिंधुदुर्गात

विकी कौशल करणार मानुषीसोबत रोमान्स !