in

‘भाजपचे मुख्यमंत्री असले की कोरोना पळून जातो का?’

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारकडून सातत्यानं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकारस्थान सुरू आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.

महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाबमध्येच कोरोना स्थिती वाईट आहे, असं केंद्र सरकार म्हणत आहे. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री नाही किंवा त्याची तिथं सत्ता नाही. मग ज्याठिकाणी भाजपाचे मुख्यमंत्री आहेत तिथून कोरोना पळून गेला का, असा खोचक प्रश्नही राऊत यांनी केला आहे. केवळ बिगरभाजप सरकार अपयशी आहेत असं चित्र रंगवलं जात आहे. मात्र, कोरोना स्थिती संपूर्ण देशात वाईट आहे, असंही ते म्हणाले.

कोरोना संकटाकाळात केंद्रान संवेदनशील राहायला हवं. प्राण जाए वर वचन न जाए, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वागत आहेत. महाराष्ट्रातील काही शहरांवर संपूर्ण देशाचा भार असतो. याचं भान केंद्रानं ठेवायला हवं. रेमडेसिवीर गुजरात भाजपच्या मुख्यालयात का आढळली. महाराष्ट्राला दिली जात नाहीत. राष्ट्र एक ठेवण्याचा प्रयत्न होत नाही. याचा निषेध राज्यातील विरोधी पक्षांनी करायला हवा, असंही राऊत म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Coronavirus | सेन्सेक्स- निफ्टीमध्ये मोठी घसरण

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह; न्यायाधीश ‘वर्क फ्रॉम होम’