in

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

विरोधी पक्षाने जर काही प्रश्न उपस्थित केले असतील तर त्याचा तपास व्हायला हवा. जर ते प्रश्न योग्य असतील तर नक्कीच तपास व्हायला हवा, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. त्या व्यक्तीचा मृत्यू ही घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. आत्महत्या की हत्या? याबाबत लोकांच्या मनात संशय आहे, असंही राऊत म्हणाले. मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लोकांच्या मनातील शंका दूर होणे गरजेचे आहे. त्या गोष्टीचं भांडवल करू नये. कारण ती निरपराध आहे. त्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? या मागचं सत्य गृहखातं जेवढ्या लवकर पुढे आणणार तितकं सरकारच्या प्रतिष्ठेसाठी योग्य ठरेल, असेही राऊत म्हणाले.

अधिवेशन सुरू असताना महत्त्वाच्या गुन्ह्यातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा अशाप्रकारे संशयास्पद मृत्यू होणं हे नक्कीच धक्कादायक आहे. पण म्हणून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही, असंही राऊत म्हणाले. त्यांच्या कुटुंबाचा, पत्नीचा आक्रोश ही व्यथित करणारी गोष्ट आहे, असेही राऊत म्हणाले.

तपास यंत्रणेकडे तपास दिल्याने योग्य होईल असं नाही तर मुंबईचे पोलिसही सक्षम आहेत. दहशतवादविरोधी पथकाकडे हा तपास सध्या दिला आहे. अशाप्रकारचा तपास उत्तम प्रकारे करणारे अधिकारी यात आहेत, असेही ते म्हणाले.

सचिन वाझेंबद्दल फार बोलणे योग्य नाही. दरम्यान, याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला आहे. त्यामुळे एनआयएची आता गरज नाही, असेही राऊत म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mansukh Hiren | मनसुख यांनी मृत्यूपूर्वी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर

मंत्र्यांनी केली चूक; मुख्यमंत्र्यांवर सारवासारव करण्याची नामुष्की