in

“राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत” संजय राऊतांची राज्यपालांवर अप्रत्यक्षपणे टीका…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या मुद्द्यांवर उच्च न्यायालयात महत्वपूर्ण टिप्पणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपालांना मंत्रीमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रस्ताव प्रलंबित ठेवता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.दरम्यान यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे.

राज्यापालांविषयी भूमिका मांडताना संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.”राज्यपालांविरोधात कोर्टात जावं लागतंय हे आमच्या घटनेचं दुर्दैवं आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. जसे देशात राष्ट्रपती तसे राज्यात राज्यपाल. त्यांना घटनेनुसार काम करण्याची विनंती करण्यासाठी आमच्यापैकी कुणालातरी कोर्टात जावं लागतंय” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

राज्य सरकारने विधानपरिषद सदस्यत्वासाठी १२ व्यक्तींची यादी राज्यपालांना पाठवून ८ महिने उलटले आहेत. त्यासंदर्भात देखील न्यायालयानं मत मांडलं आहे. “राज्यपालांनी लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या प्रस्तावावर निर्णय घ्यायला हवा. ८ महिने उलटूनही या प्रस्तावावर निर्णय दिला गेलेला नाही. हा कालावधी खूप आहे”, असंही न्यायालयाकडून यावेळी सांगण्यात आलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रानडे इन्स्टिट्यूट बिल्डरच्या हातात जाऊ देणार नाही – उदय सामंत

तामिळनाडूत पेट्रोल स्वस्त,महाराष्ट्रात कधी?