in

“देशात किसानही सुरक्षित नाहीत आणि जवानही”

पाकिस्तान काश्मिरमध्ये जे उपद्व्याप करत आहे, त्यामागे चीनचीच प्रेरणा आहे. हिंदुस्थानने यापुढे कठोर पावले टाकली नाहीत तर चीन व पाकिस्तान एकत्र येऊन आमच्या अस्तित्वालाच आव्हान देतील, चीन-पाकड्यांचा हैदोस! हिंदुस्थान काय करणार? असा परखड सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

हिंदुस्थानच्या सीमांवर अशांतता आहे. एका बाजूला चीन तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची शिरजोरी व धडाका मारणे सुरूच आहे. पण सरकार मस्त किंवा सुस्त आहे. सीमेवर तणाव आणि रक्तपात वाढला आहे. निरपराध लोकांना घरात, शाळेत, भररस्त्यात गोळ्या घालून मारलं जात आहे. मोदींचे सरकार असताना काश्मिरातून हिंदुंचे पलायन नव्याने सुरू व्हावे ही गोष्ट काही भाजपसारख्या हिंदुत्ववादाची गाजरपुंगी वाजवणाऱ्या पक्षास शोभत नाही, असा घणाघातही सामनातून करण्यात आला आहे.

दहशतवाद्यांविरुद्ध कारवाया सुरूच आहेत हे मान्य, पण त्यात आपल्या सैन्याची मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे. दहशतवादाचे पुरस्कर्ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तान आहे. इतके बळी जात असताना आपण पाकिस्तानचे काय वाईट केले? असा सवालही सामनातून विचारण्यात आला आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून पाकिस्तान शिरजोर झाला आणि काश्मिरमधील हिंसाचार वाढला असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

चीनने पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तानसारख्या राष्ट्रांचा घास गिळून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय रोवण्याची तयारी सुरू केली आहे. हे घुसखोरी करत आहेत व आपण चर्चेच्या फेऱ्या मोजत बसलो असल्याची टीकाही आजच्या सामनातून करण्यात आली आहे. देशात किसानही सुरक्षित नाहीत आणि जवानही बलिदानच देत आहेत, अशी टीकाही सामनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

देशात किसानही सुरक्षित नाहीत आणि जवानही

पाकिस्तानातून घुसखोरी सुरूच आहे व कश्मीर खोऱ्यातील स्थिती तप्त पाण्यासारखी खदखदत आहे. कश्मीर खोऱ्यातील 370 कलम हटवले खरे, पण सैन्य हटविण्यासारखी स्थिती अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. देशात किसानही सुरक्षित नाही व जवानही बलिदानच देत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Cruise Drug Case : आर्यन खानच्या अर्जावर आज सुनावणी

VIDEO | धर्मेंद्र यांची पहिली कार पाहिलीत का?