in

‘शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक, त्यावर चाल कराल तर शिवप्रसाद मिळणारच’

राम मंदिराच्या मुद्द्यावरून काल शिवसेना भवनासमोर भाजपाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, काल शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला रोखठोक इशारा दिला आहे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यावर चाल कराल तर शिवप्रसाद मिळणारच असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

शिवसेना भवन ही केवळ राजकीय वास्तू नाही तर ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले, चाल करून आले तर त्यांना शिवप्रसाद मिळणारच. आता काल मिळालेल्या शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असा इशाराच संजय राऊत यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना आणि भाजपाला दिला.

राम मंदिर जमीन गैरव्यवहार प्रकरणात भाजपावर किंवा भाजपाच्या नेत्यांवर आरोप झालेले नाही. राम मंदिर ट्रस्ट ही स्वायत्त संस्था आहेत. अस्मितेचं प्रतीक असलेल्या वास्तूवर आरोप होत आहे. त्यावर आरोप होत असेल तर त्याबाबत प्रश्न विचारणे खुलासा मागणे हा गुन्हा आहे का? असा सवालही राऊत यांनी विचारला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

JEE MAIN ऑगस्टमध्ये होणार?

‘काँग्रेस म्हणजे टायटॅनिकचं जहाज, ते बुडतच चाललंय’