in

“भाजपा कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत आज गोवा दौऱ्यावर निघाले आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मी गोव्यात जात आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे सुद्धा गोव्यात प्रचाराला जात होते. आम्हाला तिथे यश नाही मिळालं पण आमचं तिथे संघटन आहे. आता मी उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर गोव्यात जायला निघालो आहे. गोव्यात आम्ही साधरणपणे २२ जागा लढू, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने तिकडे आपण चाललो असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. बाळासाहेब ठाकरेही तिकडे प्रचारासाठी गेले होते. आम्ही जिंकलो जरी नसलो तरी तिकडे आमचे संघटन आहे, असंही राऊत यावेळी म्हणाले. त्याचबरोबर भाजपा कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राऊत यांनी यावेळी बोलताना केला.

“आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. आज भारतीय जनता पक्ष कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपाने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करु शकते. आमचं गोव्यात प्राबल्य आहे. कोणासोबत युती किंवा आघाडी झाली तर ठीक, नाहीतर आमचं आम्ही लढू”. यावेळी राऊत यांनी गोव्यातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Yavatmal Bus | 25 तासानंतर पूरातून काढली बस; घटनास्थळी बचाव पथक तैनात

जागतिक हृदय दिनानिमित्त मुंबई पालिकेकडून आजपासून जनजागृती