in

”बेळगावात मराठी माणसाचा पराभव झाला म्हणून महाराष्ट्रात फटाके वाजवले गेले, हे जास्त वेदनादायक”

मराठी माणूसच मराठी माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे काय? असा प्रश्न बेळगाव महापालिका निकालानंतर निर्माण झाला आहे. मराठी एकजूट व मऱ्हाटी लढ्याचा बेळगावात दारुण पराभव झाल्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे, पण बेळगावात मराठी माणसांचा पराभव घडताच महाराष्ट्रातील मऱ्हाटी भाजप पुढाऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. हे दुःख टोचणारं आहे. त्यांना या पराभवाने जणू हर्षवायूच झाला, अशी टीका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केली आहे.

बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारूण पराभव झाला. तर, भाजपनं बहुमत मिळवत बेळगावात सत्ता काबीज केली आहे. या निकालावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही नाराजी व्यक्त केली होती. तर, आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

‘मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या कर्मभूमीत पराभूत झाला म्हणून महाराष्ट्रात फटाके वाजवले गेले, हे जास्त वेदनादायक आहे. क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तान जिंकताच भेंडीबाजारातील काही भागात पूर्वी फटाके फुटत होते. तसलेच दळभद्री कृत्य बेळगावच्या निकालाने घडले आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

बेळगाव महानगरपालिकेवरील भगवा उतरवून पालिका बरखास्त केली तेव्हा साधा निषेधही न करणारे भाजपचे महाराष्ट्रातील पुढारी आज ‘भगवा फडकला हो…..’ म्हणून हर्षवायूने बेभान होत गोडधोड वाटत फिरत असतील तर संयुक्त महाराष्ट्राच्या 105 हुतात्म्यांचा तो अपमान आहे, असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पावसामुळे गणपती भिजले, दीड लाख रुपयांचे गणेश मूर्ती पाण्यात

इंडोनेशियाच्या तुरुंगात भीषण आग; 40 कैद्यांचा मृत्यू