in

“नाहीतर, शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही” .

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावरून शिवसेना वि. भाजपा यांच्यात युद्ध रंगताना दिसत आहे.आता यावर शिवसेनेतील नेत्यांचीही प्रतिक्रिया येत आहेत.”गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही” आणि समझनेवाले को इशारा काफी है, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत दिला.

संजय राऊत यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.”महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे.नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस सेनाभवनाच्या फुटपाथावर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतिक आहे. हे बाटग्यांना कसे समजणार”? असे संजय राउतांनी ट्विटद्वारे म्हंटलय.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी एका “भाषणात वेळ आलीतर शिवसेना भवन देखील फोडू असं वक्तव्य केलं होत”. त्यांनतर त्यांनी दिलगीरी व्यक्त करणारा व्हिडिओ प्रसारित केला आहे त्यात लाड यांनी “शिवसेना प्रमुखांचा आम्ही नेहमी आदर करतो आणि त्याच शिवसेनाप्रमुखांच्या सेनाभावनाबद्दल आम्ही कधीच वाईट बोलण शक्य नाही”. अस म्हंटल आहे,

त्यावर आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे ” “तोडफोड करणं आमची संस्कृती नाही, आम्ही तोडफोड करत नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, “आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही”, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “आता आमच्यासाठी हा विषय संपला आहे” असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सरकारविरोधात राज्यातील MPSC विद्यार्थ्यांना घेऊन राज्यव्यापी आंदोलन करू : खोत

Tokyo Olympic 2020 | बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला कांस्यपदक