लोकशाही न्यूज नेटवर्क
काही दिवसांपूर्वी बीडमध्ये अंधश्रद्धामुळे सहावर्षाचा मुलाचा बळी गेला. तरी ही आज पुन्हा पुण्याच्या वडगाव मावळमध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पिंपळाच्या झाडाला टाकावे ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांची नावे असलेली लिंब खिळ्याने ठोकून जादूटोणा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पुणे जिल्ह्यातील टाकावे येथे एक जादूटोणाच प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून टाकावे येथील इंद्रायणी नदीच्या कडेला ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, भूषण असवले आणि ऋषीनाथ शिंदे यांची नाव असलेली लिंब पिंपळाच्या झाडाला खिळण्याने ठोकण्यात आली असून जादूटोणा करण्यात आला आहे.
याप्रकरणी, अविनाश असवले यांनी पोलिसात तक्रार दिली असून हा सर्व प्रकार सरपंच आणि उपसरपंच पदाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेचा गांभीर्याने तपास करावा अस त्यांनी म्हटलं आहे
Comments
Loading…