in

पालघर साधू हत्याकांड : नवे आरोपपत्र सादर करण्याचे आदेश

पालघर साधू हत्येप्रकरणी नवीन पुरवणी आरोपपत्र दाखल करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात १६ एप्रिलच्या रात्री जमावानं जबर मारहाणीद्वारे तीन साधुंची हत्या केली होती.

येत्या २ आठवड्यांच्या आता महाराष्ट्र सरकारनं दुसरं पुरवणी आरोपपत्र सादर करावं, असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. पालघर हत्याकांडप्रकरणी कर्तव्यात कसूर केलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे, असं महाराष्ट्र सरकारनं ७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं होतं.

आतापर्यंत गुन्हा अन्वेषण विभागानं याप्रकरणी २ आरोपपत्र दाखल केली आहेत. १८ पोलिसांना वेगवेगळ्या शिक्षा देण्यात आल्या आहेत. काही जणांना सेवेतून निलंबित करण्यात आलं तर काही पोलिसांच्या वेतनात कपात करण्यात आली. काहींना सक्तीनं सेवानिवृत्त करण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PSU Bank Privatisation | सरकारी बँकांचे खासगीकरण – पंतप्रधान

मुंबईत पेट्रोलची वाटचाल शतकाकडे; वाचा आजचे दर