in

Euro Cup 2021 स्पर्धेचे वेळापत्रक आले समोर

गेल्यावर्षी कोरोनामुळे स्थगित झालेली युरोपियन फुटबॉल स्पर्धा यंदाच्या वर्षी होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून येत्या ११ जूनपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे विशेष म्हणजे ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच ११ वेगवेगळ्या शहरांमध्ये सामने होणार आहेत.

युरो कप चॅम्पियन पोर्तुगाल आणि फिफा वर्ल्डकप विजेता संघ फ्रान्ससहित सर्व संघांना ६ गटात विभागण्यात आले आहे. यावेळी लंडन, ग्लासगो, कोपेनहेगन, सेव्हिल, बुडापेस्ट, एम्स्टरडॅम, रोम, म्युनिक, बाकू, बुखारेस्ट आणि सेंट पीटर्सबर्ग येथे सामने होतील. लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर या स्पर्धेची अंतिम लढत होईल.

या महिनाभर चालणार्‍या या स्पर्धेत एकूण २४ संघ ५१ सामने खेळतील. २६ जूनपासून बाद फेरी सुरू होण्यापूर्वी प्रत्येक संघ गट टप्प्यात तीन सामने खेळेल. ११ जुलै (भारतीय वेळेनुसार १२ जुलै) रोजी अंतिम लढत खेळली जाईल. गतविजेता पोर्तुगाल १५ जूनपासून हंगेरीविरूद्ध मोहीम सुरू करणार आहे.

युरो कपसाठी गट

  • ग्रुप ए – तुर्की, इटली, वेल्स, स्वित्झर्लंड.
  • ग्रुप बी – डेन्मार्क, फिनलँड, बेल्जियम, रूस.
  • ग्रुप सी – नेदरलँड, युक्रेन, ऑस्ट्रिया, नॉर्थ मॅसेडोनिया.
  • ग्रुप डी – इंग्लंड, क्रोएशिया, स्कॉटलँड, चेक रिपब्लिक.
  • ग्रुप ई – स्पेन, स्वीडन, पोलंड, स्लोवाकिया.
  • ग्रुप एफ – हंगरी, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी भरलेल्या करातून माल काढला गेला”

शेतकरी नेते राकेश टिकैत ममता बॅनर्जींच्या भेटीला