in

पुण्यात १४ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण प्रमाण पाहता प्रशासन खडबडून जागे झालेले दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला , रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २८ फेब्रुवारीपर्यंत हा निर्णय घेण्यात आला होता. परंतु परिस्थिती पाहता या निर्णय पुन्हा वाढवण्यात आला असून, पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बद्दल माहिती दिली आहे.

“शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच ठेवणार! पुणे महानगरपालिका हद्दीत करोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल,”असे ट्विट करून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबद्दल माहिती दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात सध्या मोगलाई सुरू ; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

संजय राठोड ‘वर्षा’ बंगल्यावर; राजीनामा देण्याच्या तयारीत ?