in

आता गडचिरोलीत गोंडी भाषेतून शिक्षण..राज्यातील पहिलीच शाळा!

Childen sit on the ground in a outdoor school during a lesson in Santiniketan village in this undated handout photograph. In Santiniketan village in West Bengal -- the home of Nobel literature prize winner Rabindranath Tagore -- a voluntary initiative helping local Kora and Santhali tribal children to read and write Bengali is now so popular it needs a second building. To match Reuters Life! INDIA- / REUTERS/Stringer (INDIA - Tags: SOCIETY EDUCATION)

गडचिरोलीत आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात गोंडी भाषा बोलली जाते. मराठी बोलणाऱ्यांहून गोंडी ही पारंपारिक भाषा बोलणाऱ्यांची संख्या या आदिवासी बहूल भागात मोठी आहे. धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा वापर करून गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली आहे.

अंगणवाडी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांची ही शाळा गोंडी बोलीतून आदिवासी विद्यार्थ्यांना गोटूलचे पारंपरिक संस्कार व शिक्षण देणारे केंद्र ठरणार आहे. यासाठी रुक्ता उसेंडी, राजकुमारी कोराम, रिना आतला या विद्यार्थींनींनी पुढाकार घेतला आहे.

‘पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल’ या नावाने धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील २४४ (१), ३५० (क) आणि १३ (३) (क) या कलमांमधील तरतुदीनुसार ग्रामसभेला प्राप्त अधिकारान्वये ही शाळा सुरू करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मालेगावच्या सेंट्रल चित्रपटगृहात फोडले फटाके

…तरच महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेश देणार; दिल्ली सरकारचा मोठा निर्णय