in

‘या’ जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद!

फेब्रुवारीत पुन्हा राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात मंगळारी 6218 कोरोना रुग्ण आढळले तर 5869 जण कोरोनामुक्त झाले. राज्यातील बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिममध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आलेय. तर, दुसरीकडे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

31 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालयं बंद

जालना जिल्ह्यात मगंळवारी 117 रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना समितीची महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर, 31 मार्चपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी म्हंटलंय.कोरोना प्रतिबंधक कायद्याच्या अमंलबजावणीसाठी पथकांची स्थापना करण्यात आलीय.

जालन्यात मंगळवारी 117 नवे रुग्ण

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जालना जिल्ह्यात मंगळवारी 117 रुग्ण आढळले. आरटीपीसीआरद्वारे 106 व्यक्तींचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 11 असे एकुण 117 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता लग्न सोहळ्याचा व्हिडीओ पोलिसांना पाठवणे बंधनकारक

‘सत्तेसाठी भाजपा तडजोड करते’; ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर