in ,

वेबसीरिजचे स्क्रीनिंग गरजेचे – सुप्रीम कोर्ट

ओटीटी म्हणजे ‘ओव्हर द टॉप’ वरील वेबसीरिज बघण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र, या मध्यमावरून प्रसारित होणाऱ्या वेबसीरिज संदर्भात अनेक स्तरावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचंही स्क्रीनिंग होणं गरजेचे आहे,”असं मत व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयाने ओटीटी माध्यमावर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबाबत चिंता व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित होणाऱ्या कंटेंटसंदर्भात नियमावली आणणार असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालय ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली पाहणार आहे. काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जात आहे. ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींच ही स्क्रीनिंग होणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅमेझॉन प्राईमच्या अपर्णा पुरोहित यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान ही चिंता व्यक्त केली आहे.

‘तांडव’ या वेबसीरीजचा वाद
दरम्यान, अ‍ॅमेझॉन प्राईमवरील ‘तांडव’ या वेबसीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अपर्णा पुरोहित यांच्यासहीत अनेक कलाकार आणि निर्देशकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपर्णा पुरोहित यांची अटकपूर्व जामीनासंदर्भातील याचिका फेटाळली लावली. यानंतर अपर्णा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी आता पुढील शुक्रवारी होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Rekha Jare case; मुख्य आरोपी बाळ बोठेला कोर्टाचा दणका

विनयभंग प्रकरण; भाजपच्या नगरसेवकाला अटक