in

RBI Report |कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेला २ लाख कोटींचा फटका बसणारा !

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबर फटका अर्थव्यवस्थेला बसणार आहे अशी शक्यता भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे. दुसऱ्या लाटेमुळे चालू आर्थिक वर्षादरम्यान उत्पादनात २ लाख कोटी रूपयांचं नुकसान होऊ शकतं असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) वर्तवला आहे.आर्थिक उत्पादानाच्या नुकसानीचा जीडीपी सोबत थेट संबंध असणार नाही, परंतु अर्थव्यवस्थेत पण अर्थव्यवस्थेतील मूल्यवर्धित तोट्याकडे तो निर्देशित करतो, असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे.

यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं आपल्या मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये जीडीपीचा अंदाज कमी केला होता. तसंच सुरू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के केला होता. यापूर्वी जीडीपी वाढीचा दर हा १०.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पहिल्या तिमाहित जीडीपी १८.५ टक्क्यांच्या दरानं वाढेल या तथ्यावर प्रोजेक्शनचा अंदाज बांधण्यात आल्याचं रिझर्व बँकेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा मिताली मयेकरच्या मोहक अदा

राफेल नदालची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून माघार