in

मुंबईत कलम 144 लागू; 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई

पुण्यानंतर आता मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी पुढील 9 दिवस कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील 9 दिवस सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास मनाई आहे. मुंबई पोलिसांकडून या संबंधित आदेश जारी करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश दिले आहेत. त्यासह आता मुंबई पोलिसांकडून मुंबईत कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील 9 दिवस सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास मनाई आहे. मुंबई पोलिसांकडून या संबंधित आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने, नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अभिनेता रजत बेदीच्या कारच्या धडकेत गंभीर जखमी पादचाऱ्याचा मृत्यू

शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे समर्थकांमध्ये राडा