in ,

परिणीती चोप्रा वाढदिवस पाहा खास फोटो

चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज (22 ऑक्टोबर) 33वा वाढदिवस आहे. तिचा जन्म हरियाणाच्या अंबाला येथे झाला. सध्याच्या काळात चित्रपट सृष्टीत सुप्रसिद्ध नाव कमावलेल्या परिणीतीला लहानपणापासूनच चित्रपट जगात जाण्याची आवड होती . खरं तर ती एक हुशार विद्यार्थिनी होती आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून, करिअर घडवण्याच्या दिशेने ती काम करत होती. परीने चित्रपट जगतात प्रवेश केला.
अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देऊन हुशार परिणीती चोप्रा 12 वीमध्ये वर्गात आणि देशात अव्वल आली आणि राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा सन्मान देखील झाला. यानंतर तिने अर्थशास्त्र, व्यवसाय आणि वित्त विषयात पदवी मिळवली .

2009 मध्ये जेव्हा मंदी आली तेव्हा परी गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम करत होती आणि या मंदीमुळे तिला आपली नोकरी गमवावी लागली.


परिणीतीचा रणवीर सिंहसोबतचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही. पण तिने पुढे बराच काळ आपली पुढची वाटचाल केली होती . परिणीतीच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. अर्जुन कपूरचा दुसरा चित्रपट “इश्कजादे “यशस्वी झाला .

तिने ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘गोलमाल अगेन’, ‘नमस्ते लंडन’, ‘केसरी’, ‘जबरिया जोडी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय काही चित्रपटांचे काम आता सुरु आहे. नुकतेच तिचे ‘संदीप और पिंकी फरार’, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि ‘सायना’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

One Avighna Park Fire | ‘त्या’ इमारतीत नेमकं काय घडलं?

नव्या स्पायवेअरचा मोबाईल डेटावर होऊ शकतो हल्ला!