in

पाहा सुप्रिया सुळेंच्या वाढदिवसाचे खास फोटो

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा काल दि. ३० जून रोजी वाढदिवस होता.


सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला.


वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


सुप्रिया सुळे या आई प्रतिभा पवार आणि वडील शरद पवार यांच्यासोबत केक कापताना दिसत आहेत.


मुलगी रेवतीच्या या ‘खास गिफ्ट’ने सुप्रिया सुळे भारावून गेल्या. त्यांनी फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “हा केक माझ्या वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट… कालपरवापर्यंत अवतीभवती वावरणारी माझी लेक रेवती आता नोकरी करते. तिने तिच्या पगारातून माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून हा केक आणला आणि आईचं मन लेकीच्या कौतुकानं सुखावलं. मुलांचं यश आई-वडीलांना आपल्या यशापेक्षा नेहमीच मोठं वाटतं” असे सुप्रिया सुळेंनी इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे.


(फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे / इन्स्टाग्राम)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘चीनवर दादागिरी कराल तर डोकं ठेचू’

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढणे होणार महाग