in ,

आर्यनची अवस्था पाहून ‘या’ व्यक्तीला अश्रु अनावर

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि सात आरोपींना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मुंबई न्यायलयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांसह इतरांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. आर्यन खान याला 8 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. त्याच्यासोबतच आणखी 8 जणांनीही एनसीबीच्या कोठडीत आणखी एक रात्र काढली.

दरम्यान, आर्यनबाबतची सुनावणी सुरु असताना तिथे एका खास व्यक्तीचीही हजेरी होती. ही व्यक्ती म्हणजे शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी. न्यायालयात सुनावणीदरम्यान, पूजा सतत रडत होती. आर्यनची अवस्था बघुन पुजाला अश्रु अनावर झाले होते. एनसीबीने न्य़ायालयाला सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत 17 जणांना अटक केली आहे. यामध्ये एक नायजेरियन व्यक्ती आहे. त्याच्याकडून 40 इक्टसी टॅबलेट जप्त करण्यात आली आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Indian Air Force Day | राफेल,तेजस,सुखोई दाखवणार आपली ताकत, चीनसह पाकिस्तानला मोठा संदेश

RBI चे पतधोरण जाहीर, व्याजदर जैसे थे!