लोकशाही न्यूज नेटवर्क
इतर देशांच्या तुलनेत अधिक उत्पादन खर्च, देशांतर्गत पुरवठा साखळी व वाहतूक यांचा अभाव तसेच मोठी आर्थिक गुंतवणूक व वीजेची गरज, अभिकल्पज्ञांच्या मर्यादा, संशोधन,विकास व कौशल्यविकासाकडे झालेले दुर्लक्ष अश्या अनेक व अन्य बाबींमुळे भारतातील वैद्यकीय उपकरण क्षेत्र समस्यांनी वेढले गेले आहे.
वैद्यकिय उपकरणांच्या देशांतर्गंत निर्मिती तसेच त्यासाठी उत्तम गुंतवणूक यांना चालना देण्याच्या देण्याच्या उद्देशाने, औषधनिर्माण विभागाने प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव (PLI) योजना जारी केली आहे. वर्ष 2020-21 ते 2027-28 या कालावधीमध्ये 3,420 कोटी रुपये खर्चाची गुंतवणूक अपेक्षित असणाऱ्या या क्षेत्रात स्वदेशी वैद्यकीय उपकरणे निर्मितीला चालना मिळून निर्मितीसाठी योग्य त्या सुविधा मिळाव्यात असा यामागील उद्देश आहे.
यासाठी चार वैविध्यपूर्ण क्षेत्रांशी संबधीत उपकरणे म्हणजे “कर्करोग देखभाल/रेडिओथेरपी वैद्यकीय उपकरण”, “ रेडिओलॉजी व इमेजिंग वैद्यकीय उपकरणे (आयोनाझिंग व नॉन-आयोनायझिंग दोन्ही प्रकारातील) व न्युक्लिअर इमेजिंग उपकरणे”, “अस्थेटिक्स व कार्डीओ-रेस्परेटरी वैद्यकीय उपकरणे” याशिवाय “कार्डिओ—रेस्परेटरी प्रकारासाठी कॅथेटर्स व रिनल केअर वैद्यकिय उपकरणे” या उपकरण निर्मितीसाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी प्रकल्प उभारण्यासाठी एकूण 729.63 कोटी रुपये गुंतवणूक होईल आणि 2,304 जणांना रोजगार मिळेल.
Comments
Loading…