राज्यात परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब आणि रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांची चांगलीच कसोटी लागली आहे. भाजपकडून या सर्व प्रकरणात धुवाधार बॅटींग करून सत्ताधाऱ्यांसमोर सामना उभा केला आहे. दरम्यान आज अनेक दिवसांनी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेटसह राजकीय मैदानात तुफान फटकेबाजी केली.
“सध्याच्या परिस्थितीत इतके लूज बॉल मला मिळत आहेत, की ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील. आणि बॉलिंगचं बोलायचं, तर मी बॉडीलाईन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल, ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. त्यामुळे मला वाटतं की समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.
“क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित .करायचो पण जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही. पण आता माझं ठरलंय, मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही करणार आहे आणि बॅटिंगला येईन, तेव्हा शॉट्स देखील खेळणार आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
Comments
Loading…