in

सेनगाव गाव औंढा नागनाथ नगरपंचायतीचा वाजला बिगुल

21 डिसेंबरला मतदान आचार संहिता लागू

गजानन वाणी | हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व ओंढा नागनाथ नगरपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने निवणुका कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 21 डिसेंबर ला दोन्ही नगर पंचायतचे मतदान होणार असून नगर पंचायत अंतर्गत आचार साहिता लागू करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक विभागाने राज्यातील मुदत संपलेले 105 नगर पंचायतिचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे प्रभाग निहाय याद्या 29 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत मतदान 21 डिसेंबर ला होणार असल्याने राजकीय पक्ष आता चांगलेच कामाला लागले आहेत नगरपंचायत निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे नगरपंचायती नगर पालिका नागरी अधिनियम 1965 च्या कलम अ नुसार राखीव जागेवर निवडणुक लढवनाऱ्या उमेदवाराने नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .. विभागाने लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने राजकीय मंडळींची कागदोपत्र जुळवा जुळवीची चागलीच धावपळ उडाळी असल्याच पाहायला मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतच्या संघर्षाची कहाणी एकदा वाचाच…!

गौतम गंभीर यांना मिळालेला धमकीचा ई-मेल पाकिस्तानातून