in

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सतीश शर्मा यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि गांधी कुटुंबियांचे जवळचे सहकारी कॅप्टन सतीश शर्मा यांचे निधन झालं आहे. ७३ वर्षीय कॅप्टन सतीश गोव्यात अखेरचा श्वास घेतला. गेला काळ ते कॅन्सरशी झुज देत होते यादरम्यान त्यांना इतर आजारांचीही बाद झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांनी तीन वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये शर्मा अमेठीमधून निवडून आले होते. १९९८ ते २००४ हा काळ शर्मा रायबरेलीमधून खासदारकीचे धुरा सांभाळली. यानंतर २००४ ते २०१६ दरम्यान राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचे कामकाज सांभाळले.

राजीव गांधींचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून कॅप्टन सतीश शर्मा यांची ओळख होती. पी.व्ही नरसिंह राव सरकारच्या काळात त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाची धुरा सांभळली. अमेठी आणि रायबेरली मतदारसंघातून त्यांनी नेतृत्त्व केले.

११ ऑक्टोबर १९४७ रोजी आंध्रप्रदेशमधील सिकंदराबादमध्ये कॅप्टन सतीश शर्मा यांचा जन्म झाला. राजकारण प्रवेशाआधी शर्मा हे पेशाने व्यावसायिक वैमानिक होते. परंतु राजीव गांधींमुळे ते राजकारणात आले. नंतर सोनिया गांधींसाठी त्यांनी ती जागा रिक्त केली. त्यांच्या निधनावर आता काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Weather Update | ‘या’ तारखांना मुसळधार पावसाची शक्यता

Rail Roko | आज देशभरात शेतकऱ्यांचा ‘रेल रोको’, सुरक्षा तैनात