in

चंद्रपूरमध्ये वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ

मध्य चांदा वन विभागाचे राजुरा वनपरिक्षेत्राचे विहिरगाव उपक्षेत्र तथा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक 172 मध्ये नर वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. वाघाचा मृत्यू कसा झाला आहे हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल ,सध्या मोका पंचनामा व पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी दिली आहे सध्या अतिशय गोपनीय रित्या राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी वरिष्ठांचे मार्गदर्शनात मोक्यावरील पंचनामा करून जागेवरच दहन करण्यात आले आहे. वाघ सडलेल्या अवस्थेत आढळून आला या वाघाचा 4 ते 5 दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा ,परंतु मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानुसार स्पष्ट होईल.

उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहचून कार्यवाही केली विशेष म्हणजे पाच दिवसापासून वाघाचा मृत्यू होऊन सडण्याची प्रक्रिया सुरू झाली असे असताना संबदीत वन कर्मचाऱ्यांना त्या घटनेची माहिती कशी मिळाली नाही,शिवाय या क्षेत्रात काही दिवसांपूर्वी या क्षेत्रात अस्वलीचे एक पिल्ले मृतावस्थेत आढळून आले होते, सुमठाणा मार्गावर चितळाचा मृत्यू सुद्धा होत आहे त्यामुळे वन्य जीवाचे सरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वनकर्मचार्यावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

थकीत वेतनामुळे सफाई कर्मचाऱ्याने नगरपरिषद आवारात घेतला गळफास

‘Maratha Reservation साठी पंतप्रधानांना पाठवणार एक कोटी पत्रं‘ राष्ट्रवादी युवकची नवीन मोहीम