in

Sensex Crash | शेअर बाजारात घसरण , सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी कोसळला

संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी तुफान विक्री केली. या विक्रीने सेन्सेक्स १३०० अंकांनी कोसळला तर निफ्टी ४०० अंकांची घसरण झाली. या पडझडीत गुंतवणूकदारांनी तीन लाख कोटी गमावले आहेत. आजच्या चौफेर विक्रीने मुंबई शेअर बाजाराच्या मंचावरील सर्वच्या सर्व ३० शेअर घसरले आहेत. यात सन फार्मा, इन्फोसिस, डॉ रेड्डी लॅब, टीसीएस, एचयूएल, नेस्ले, चासीएल टेक, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, मारुती या शेअरला मोठा फटका बसला आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

CORONA | कोरोना वॉरियर्ससाठीची असलेली विमा योजना मोदीं सरकारने केली बंद

Delhi Lockdown | राजधानीत लॉकडाऊन, मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा