in

Sensex Fall | शेअर बाजारात एक हजार अंकांची घसरण

शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरूच आहे. शेअर बाजाराचे व्यवहार आज सकाळी सुरु झाल्या झाल्या एक हजारांहून अधिक अंकाची पडझड झाल्याचे चित्र पहायला मिळालं. जागतिक बारपेठेमधील घसरण या पडझडीला कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळी ९ वाजून १८ मिनिटांनी शेअर बाजार सुरु झाला तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधील सेन्सेक्स ५० हजार १८४.६० वर होता. काल बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स ५१ हजारांवर होता. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी हा निर्देशांकही २८३.४५ अंकांनी घसरला आणि १४.८३५.४५ वर स्थिरावला. कालच्या तुलनेत सेन्सेक्समध्ये १.६८ टक्के तर निफ्टीमध्ये १.८७ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स एक हजार अंकांनी घसरला होता.

आज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयकडून भारताच्या जीडीपीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर २०२०-२१ मध्ये जीडीपीची किती वाढ झाली यासंदर्भातील आकडेवारी आज जाहीर होणार असल्याने त्यावरही बाजारामधील चढ उतार अवलंबून असेल.

अमेरिकेतील वॉल स्ट्रीटमध्ये घसरण झाल्याने आशियामधील जवळजवळ सर्वच शेअर बाजारांमध्ये आज नकारात्मक सुरुवात झाल्याचे पहायला मिळालं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव गडगडल्याचे चित्र दिसलं. ऑस्ट्रेलियातही शेअर बाजाराचा निर्देशांक दोन टक्क्यांनी घसरला. जानेवारी २८ नंतरची ऑस्ट्रेलियन शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. जपानचा शेअर बाजार १.८ टक्क्यांनी गडगडला तर हाँगकाँगच्या शेअर बाजारामध्येही १.६९ टक्क्यांची घसरण पहायला मिळाली.

अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवरील नॅसडॅकमध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. नॅसडॅकमधील मागील चार महिन्यातील एका दिवसातली सर्वात मोठी घसरण गुरुवारी पहायला मिळाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महिला अत्याचार : मस्कारा आणि आयलायनर ठरणार पुरावे…

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला झटका.. ‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तान