in

राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा गंभीर आरोप; 2 कोटीच्या जमिनीची किंमत 5 मिनिटांत झाली 18.5 कोटी

राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा गंभीर आरोप 2 कोटीच्या जमिनीची किंमत 5 मिनिटांत झाली 18.5 कोटी हा आरोप आम आदमी पार्टीचे (AAP) राज्यसभा सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी केले आहेत. तसेच याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून चौकशी केली जावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी संस्थेचे सदस्य अनिल मिश्रा यांच्या मदतीने 2 कोटी किंमत असणारी जमीन 18 कोटी रुपयांना खरेदी केली.

त्यामुळे त्याची सखोल चौकशी केली जावी अशी त्यांची मागणी आहे. एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, भगवान श्री राम यांच्या नावाने कोणताही घोटाळा आणि भ्रष्टाचार करण्याची कोणी हिंमत करेल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. पण मी तुम्हाला जी कागदपत्रे दाखवणार आहे ती सरळ सरळ हेच सांगतील, की रामजन्मभूमी ट्रस्टच्या नावावर चंपत राय जी यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

हे उघडपणे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. मी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारकडे अशी मागणी करतो, की याप्रकरणाची ईडी आणि सीबीआय चौकशी व्हावी. यावर चंपत राय यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, अशा प्रकारच्या आरोपांना ते घाबरत नाहीत. ते स्वत: वर झालेल्या आरोपांचा अभ्यास करतील. माध्यमांना प्रसिद्ध केलेल्या संक्षिप्त निवेदनात राय म्हणाले, “आमच्यावर महात्मा गांधींची हत्या केल्याचा आरोपही करण्यात आला. आम्हाला आरोपांची भीती वाटत नाही. मी या आरोपांचा अभ्यास करुन चौकशी करीन.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सालेकसा शाखेच्या वतीने पेट्रोलचे 10 रुपये प्रतिलीटर प्रमाणे वाटप