in

Serum Institute | सीरमने लसची किंमत केली कमी; पुनावालांची माहिती

देशात १ मेपासून करोनावरील लसीकरण मोहीमेचा तिसरा टप्पा सुरू होतोय. अशातच एक चांगली बातमी आली आहे. कोरोनावरील लस उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या लसीची किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. राज्य सरकारांसाठी ही किंमत कमी करण्यात आली आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्वीट करून दिली आहे.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लस उत्पादक कंपन्यांंना आपल्या उत्पादनातील ५० टक्के वाटा हा राज्ये आणि खुल्या बाजारात विकण्याची परावनगी दिली. यानंतर लस उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारसाठी असलेली लसीची किंमत १५० रुपये प्रति डोस कायम ठेवत राज्ये आणि खुल्या बाजारात म्हणजे खासगी हॉस्पिटल्ससाठी लसची किंमत जाहीर केली. यानुसार राज्यांना प्रति डोस ४०० रुपये आणि खासगी हॉस्पिटल्सना प्रति डोस ६०० रुपये द्यावे लागणार होतो. सीरम बरोबरच लस उपत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक या कंपनीने आपल्या कोवॅक्सिन लसची किंमतही जाहीर केली. दोन्ही कंपन्यांनी केंद्र सरकार दिल्या जाणाऱ्या दरापेक्षा राज्ये आणि खासगी हॉस्पिटल्ससाठी अधिक दर जाहीर केल्याने वाद निर्माण झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसेच्या ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

मनोरुग्णाने खाल्ला अर्धवट जळालेला मृतदेह; फलटण स्मशानभूमीतील प्रकार