in ,

अनिल देशमुखांना सत्र न्यायालयाचे समन्स जारी, भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे आरोपामुळे अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आज चीफ मेट्रोपोलिटन कोर्टाकडून अनिल देशमुखांना (Former Home Minister Anil Deshmukh) समन्स जारी करण्यात आला असून १६ नोव्हेंबरपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. देशमुख तपासात सहकार्य करत नसल्यामुळे ईडीने विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरच आज सुनावणी घेण्यात आली.

शंभर कोटी वसुलीचे आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून केंद्रीय तपाससंस्था त्यांच्या हात धुवून मागे लागल्या आहेत. देशमुखांकडे ईडीने आतापर्यंत सहा व सीबीआयने दोन वेळा छापा टाकला. हवालामार्फत सुमारे चार कोटी रुपये देशमुख यांच्या मालकीच्या साई शिक्षण संस्थेच्या खात्यात जमा झाल्याने ते आणखीच अडचणीत आले आहेत.

प्राप्तिकर विभागाने देशमुखांच्या घरी प्रथमच छापे टाकले होते. वारंवार नोटीस देऊन उपस्थित राहत नसल्याने देशमुख यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. सुमारे महिनाभरापासून ते अज्ञात स्थळी आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाकरे उड्डाणपुलावर खड्डेच- खड्डे; नागरिकांचा जिव धोक्यात

आनंदराव अडसूळांचं हॉस्पिटलमध्ये नाटक; रवी राणा यांचा आरोप