राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी वाशिम जिल्ह्याच्या पोहरादेवी येथे केलेले शक्तीप्रदर्शन मंदिरातील महंतांसह सातजणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तथापि, मंत्री राठोड हे केवळ दर्शनासाठी पोहरादेवीला गेले होते. त्यामुळे, तिथे गर्दी झाली. संजय राठोड यांनी माणसे जमवली नव्हती, असा खुलासा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.
संजय राठोड यांनी पोहरादेवी मंदिराला भेट देऊन सपत्निक दर्शन घेतले होते. त्याच पोहरादेवी मंदिरातील महंत कबिरदास महाराज उपाख्य कबीर राठोड व त्यांच्या कुटुंबातील चार जण यांच्यासह एकूण सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध जाधव यांनी दिली.
या गर्दीबाबत शंभूराज देसाई यांनी माहिती दिली आहे. पोहरादेवी येथे कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत, असे सांगतानाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उद्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले असल्याचे देसाई यांनी सांगितले.
Comments
Loading…