in

भारतापासून वेगळं व्हा, शीख फॉर जस्टिसचं उद्धव ठाकरेंना आवाहन

‘शीख फॉर जस्टिस’(SFJ)संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भारतापासून वेगळं होण्यासाठी पत्र पाठवलं होतं. या पत्रात ‘दोन्ही राज्यांनी भारतीय संघ राज्य व्यवस्थेतून बाहेर पडून स्वातंत्र्य जाहीर करावं आणि संबंध तोडून टाकावेत अशी मागणी ‘शीख फॉर जस्टिस’ने केली होती.

आता SFJ ने एक वेबसाइट लाँच केली आहे. या माध्यमातून SFJच्या मागणीची दखल घ्यावी, यासाठी त्यांनी लोकांना दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ई-मेल पाठवण्याचे आवाहन केले आहे. ‘शीख फॉर जस्टिस’ ही स्वतंत्र खलिस्तानचे समर्थन करणारी देशविरोधी संघटना आहे. भारत सरकारने शीख फॉर जस्टिसवर बंदी घातली आहे. सध्या दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आणि प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेला हिंसाचार, या मध्ये SFJ चा सहभाग असल्याचा आरोप केला जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाहा कोण असणार नवी दया बेन…

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर