भारतात गुन्हेगारीची संख्या जरी जास्त असेल तरी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच महिला गुन्हेगाराला फाशी देण्याची घटना घडणार आहे. शबनम नावाच्या महिलेला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून तिला फाशी देण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या महिलेचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. शबनमने प्रियकरासाठी स्वत:च्या कुटुंबीयांची हत्या केली होती. त्यामुळे महिलेला फाशी होणार आहे.
काय आहे प्रकरण ?
२००८ साली उत्तर प्रदेशमध्ये शबनम आणि सलीम या दोघांचे प्रेमसंबंध होते. शबनम एका शाळेत शिक्षिका होती. तर तिचा प्रियकर सलीम हा फक्त आठवी पास होता. दोघांना एकमेकांशी लग्नही करायचे होते. पण कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. या दोघांच्या जातीही वेगळ्या असल्यामुळे शबनमच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. दरम्यान सलीम आणि शबनम यांच्या भेटीत नात्यात अडसर ठरणाऱ्यांचा काटा काढण्याचे ठरले. म्हणूनच तिने आपल्या कुटुंबियांना जेवणातून झोपेचे औषध दिले. त्यानंतर शबनमने कुऱ्हाडीने आपल्या कुटुंबातील सात जणांना ठार केले. त्यात वडील शौकत, आई हाशमी, भाऊ अनीस, राशी, वहिनी अंजुम आणि आतेबहिण राबिया यांचा समावेश होता.
खून केल्यानंतर शबनमने अज्ञात व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना संपवल्याचा कांगावा केला होता. मात्र पोलीस चौकशीत शबनमने सर्व हकीगत सांगितली. पोलिसांनी शबनम आणि सलीमला अटक केली. शबनमने कोठडीत असताना एका बाळाला जन्मही दिला आहे.
Comments
Loading…