in

Shantabai Pawar आजींचा लाठ्या काठ्यांचा खेळ…जेव्हा व्यवस्थेला ‘मर्दानी’वर आणतो!

अमोल धर्माधिकारी | देशभरात सध्या पुण्याच्या मर्दानी आजींचा लाठ्या काठ्यांचा खेळ खूप चर्चिला जातोय. ज्या वयात वयोवृद्ध अंथरुणाला खिळून बसलेली असतात त्या वयात शांताबाई पवार रस्त्यावर लाठ्याकाठ्यांचा खेळ करून जगण्यासाठी धडपड करत होत्या. मात्र एकाच रात्री त्यांचा हा मर्दानी खेळ व्हायरल झाला आणि त्या अचानक प्रसिद्धी झोतात आल्या. प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा त्यांचा हा विषय उचलून धरला. त्यानंतर मदतीचा ओघ सुरु झाला, मंत्री ,स्थानिक नेते अशाच साऱ्याचीचं तिच्या घराजवळ रीघ लागली. त्यामुळे शांताबाईंच्या या लाठ्याकाठ्यांच्या कर्तबगारीने स्थानिक प्रशासन व्यवस्थाही वठणीवर आली. दुर्लक्षित झालेली हडपसर मधली ती गोसावी वस्ती प्रशासनाने सफाचक झाली. त्यामुळे चला आजीच्या निमित्तानं का होईना…प्रशासन कामाला लागले आणि… गोसावी वस्तीत स्वच्छता झाली.. हो!असे म्हणायला आता हरकत नाही.

एका रात्रीत जगभरचर्चेत आलेल्या शांताबाई आजी कालपासून जाम बिझि झाल्या आहेत. एक फोन उचलला कट केला की लगेच दुसरी रिंग वाजतेय…पलीकडून आजीचं कौतुक केलं जातं मग अकाउंट नंबर मागून पैसे पाठवतोय असा मेसेज आजीला दिला जातो.कालपासून ही आजी आणि तिचं घर फारच चर्चेत आलय…लोकशाहीसारखी इतर माध्यम सकाळपासूनच तिच्याच घरी ठाण मांडून बसली आहेत.आता तर मंत्र्याचीही रीघ लागणार होती. मात्र मुख्य रस्त्यातून तिच्या घराकडे जाताना गटार झालेला कॅनॉल… बाजूनं जाताना चिखलात तयार झालेला रस्ता…मात्र आज काही वेगळंच चित्र पाहायला मिळालं….राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख येणार म्हणल्यावर… महापालिका खडाडून जागी… आधी हा परिसर कंटेन्मेंट झोन होता पण स्थानिकांच्या मते आता नाही, तर दुसरीकडे एवढ्या छोट्या गल्लीत मंत्री साहेब येणार म्हणल्यावर रस्ते चकाचक… औषध फवारणी…. खडी टाकणे जागा कशी एकदम सपाट…सगळीकडे पावडर मारली…. आरोग्य कर्मचारी आणि अधिकारी जातीन हे काम करत होते ते फक्त मंत्री साहेब येणार म्हणून….

आजी फेमस झाली नसती तर तिला चिखलातुनच वाट काढत बाहेर जाव लागायचं… पण आज तिच्या घरासमोर जरा मोकळं मोकळं आणि स्वच्छ वाटत होतं…त्यामुळे आजीच्या निमित्ताने का होईना तो तेवढा भाग स्वच्छ आणि नीटनेटका झाला हे पाहून आजूबाजूला राहणाऱ्या त्या झोपडपट्टीतील लोकांनापण बर वाटल असेल…नाहीतर एरवी कोण तिथं भटकंतय….पण आज हडपसर मधली ती गोसावी वस्ती म्हणून ओळखली जायची पण आता शांताबाई राहते म्हणून ओळखली जाईल…

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाड दुर्घटना; संसारासह सारचं जमिनीत मिसळल…मात्र आपत्ती आली तरी संजगता महत्वाची