in

‘शिवसेना हा विश्वासू पक्ष’; वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवारांकडून स्तुतीसुमनं

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादीच्या २२व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना, शिवसेना हा विश्वासू पक्ष आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती होती.

देशात अनेक पक्ष आले आणि गेले. राष्ट्रवादीनं राज्यात नवी फळी उभी केली. कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे २२ वर्ष पूर्ण केले. महाविकास आघाडीला जनतेनं स्वीकारलं आहे. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर ती अधिक लोकांच्या हाती जायला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकाला मी सत्तेत वाटेकरी आहे, असं वाटायला पाहिजे. हे केल्यास आपल्याला लोकांचा पाठिंबा मिळेल, असं यावेळी बोलताना शरद पवारांनी सांगितलं.

पंचायत राज्यात ओबीसींना जागा देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. गावचे पोलीस पाटील पदासाठी ओबीसींसह सर्वांना आरक्षण ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. निवडणुका न लढवण्याचा शब्द बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना दिला होता तो त्यांनी पाळला, असं सांगत पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

Gold price today | सोने – चांदीच्या भावात घसरण