in

Aryan Khan Drug Case | एनसीबीने पक्षीय लोकांना कारवाईत सामावून घेतले- शरद पवार

रूपेश होले, बारामती | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर राजकारण चांगलेच तापू लागले. नबाव मलिकांनी आर्यन खान कारवाईत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर आता एनसीबीनं पत्रकार परिषद घेत ते साक्षिदार असल्याचे स्पष्टीकरण दिले.याचं प्रकरणावर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एनसीबीचे कान उपटले.

बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ”साक्षीदार हे एखादी घटना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्यासंबंधी न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावले जातात. कारवाई वेळी पकडणे हे साक्षीदारांचे काम नव्हे. मुंबई ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना घेवून जाणारे लोक शासकिय यंत्रणेचे नव्हते. नंतर खुलासा करण्यात आला की ते साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. याचा अर्थ या कारवाईत काही पक्षीय लोकांना सामावून घेण्यात आले होते. ड्रग्ज प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे. परंतु ती या पद्धतीने नको, असे मत पवार यांनी व्यक्त केले.”

एनसीबी काय म्हणाली ?

एनसीबीकडून ज्ञानेंदर सिंग आणि समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईल, मनीष भानुशाली, आदिल उस्मानी, अर्पणा राणे, प्रकाश बहादूर हे वैयक्तिक साक्षीदार आहेत. सारे पंचनामे कायद्याने बनवलेत. स्वतंत्र साक्षीदार आहेत. काही आरोप लावण्यात आलेत, ते बिनबुडाचे आहेत. आमच्यावर जे आरोप केलेत ते चुकीचे आहेत, असंही स्पष्टीकरण एनसीबीनं दिलंय.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अधिकाराचा गैरवापर किती दिवस सहन करणार – शरद पवार

एखाद्या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करायला हव्यात; पवारांचा अप्रत्यक्षपणे मोदींना टोला