in

भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार!

भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज २ ऑगस्टपासून सुरु होणार असून त्या प्रकरणी शरद पवार आपला जबाब नोंदवणार आहेत.

पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. याप्रकरणी NIA ने आठ जणांविरुद्ध 10 हजार पानांचे आरोपपत्र विशेष NIA न्यायालयात दाखल केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाची मुदत गतवर्षी एप्रिल महिन्यात संपली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ मिळाली, मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे काम ठप्प होते. आता 2 ऑगस्टपासून आयोगाचे कामकाज सुरू होत आहे. याप्रकरणी प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Acid attack | घाटकोपरमध्ये महिलेवर अ‍ॅसिड हल्ला

MPSC विद्यार्थ्यांचे पुण्यात चक्काजाम आंदोलन