in

शेअर मार्केटमध्ये घसरण

कोरोना काळात संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था बदली आहे. त्यात जागतिक बाजारपेठेत नैसर्गिक तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाईचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. त्याच्यातच जागतिक भांडवली बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर येथील गुंतवणूकदारांनीही समभाग विक्रीचा सपाटा गुरुवारी लावला. परिणामी, प्रमुख निर्देशांकांची सलग तीन व्यवहारांतील तेजी थांबली.

सत्रात मुंबई निर्देशांक ९०५ अंशांपेक्षा कमीचे व्यवहार नोंदवत होता. दिवसअखेर मात्र तो काहीसा सावरला असला तरी बुधवारच्या तुलनेत त्यात घसरण झाली. सेन्सेक्स ५९८.५७ अंश घसरणीसह ५०,८४६.०८ वर स्थिरावला. तर निफ्टी १६४.८५ अंश घसरणीने १५,०८०.७५ वर बंद झाला. एकाच व्यवहारातील ६०० अंश घसरणीने सेन्सेक्सने त्याचा ५१ हजारांचा स्तरही सोडला. तर दीडशेहून अधिक अंश घसरणीमुळे निफ्टी १५ हजारांवर येऊन ठेपला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास एटीएसकडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

देवेंद्र फडणवीसांवर तृतीयपंथीयाशी संबंध असल्याचा आरोप; आरोपीवर तडीपाराची कारवाई