in ,

शिर्डी विमानसेवा आजपासून सुरू,साईभक्तांनी केले आनंद व्यक्त

कोरोना महामारीमुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डी विमानतळ आज १० ऑक्टोंबर पासून सुरू झाले आहे. स्पाइस जेटचे चेन्नई हून शिर्डीत पहिलं विमान आज दाखल झालं. या विमानात १७४ प्रवासी होते.
या विमानातील प्रवाशांचे शिर्डी विमानतळावरील अधिकारी, कर्मचारी, काकडी ग्रामस्थ,विमानतळ टॅक्सी प्रवासी संघटनांच्या पदाधिकारी यांनी पेढे भरवून प्रवाशांचे स्वागत केलंय.साईबाबांच्या दर्शनाला पहिल्याच विमानात आल्याचा साईभक्तांनी आनंद व्यक्त केले.

या विमानातून शिर्डीहून चेन्नईसाठी ५८ प्रवाशांनी आरक्षण केल होत. साईबाबांचे मंदिरे सुरू झाल्यानंतर विमानसेवा सुरू करावी अशी मागणी वारंवार होत होती. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ विकास प्राधिकरणानं हे विमानतळ नागरिकांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला. शिर्डी साईबाबा अंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरुवातीला स्पाईस जेट, इंडिगो एअरलाईन्सची सेवा दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई या ठिकाणासाठी असणार आहे. मंगळवारपासून दिल्ली आणि चेन्नईची नियमित विमानसेवा सुरू होणार असून. पुढील काही दिवसांत राज्यातील इतर शहरातूनही विमाने शिर्डीला येणार आहेत. अशी माहिती विमानतळ विकास प्राधिकरणाने दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘स्वतःच्या पैशाने लस घेतलीये, प्रमाणपत्रावरुन मोदींचा फोटो हटवा’

अन्यथा पुन्हा लॉकडाऊन, छगन भुजबळांचा इशारा