in

शिवसैनिकांनी अडवला देवेंद्र फडणवीस यांचा ताफा

भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना मुक्ताईनगरमधून त्यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी, शेतकऱ्यांच्या केळी पिक विम्याबाबत फडणवीस यांना जाब विचारण्यात आला.

एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस हे मुक्ताईनगर दाखल झाले आहे. खासदार रक्षा खडसे यांच्या घरी जाऊन त्यांनी भेट घेतली. त्यानंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले असता परिवर्तन चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांचा ताफा अडवला.

चंद्रकांत पाटील यांचा आठ महिन्याचा कार्यकाळ होता. त्यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. स्वत: भावी मुख्यमंत्री म्हणून घेता पण त्यांनीही काहीच काम केले. मुक्ताईनगरच्या जिल्हा हॉस्पिटलचेही काहीच काम केले नाही, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. तसंच, एकनाथ खडसे अनेक वर्ष भाजपचे आमदार असताना सुद्धा कुठली विकास कामे केले नसल्याचा आरोप ही केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पदोन्नतीतील आरक्षण | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक सुरू

देशाच्या GDPमध्ये 7.3 टक्क्यांची घसरण