in

सांगलीत चोरीच्या प्रकरणी शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना अटक

मिरजेत चोरीच्या प्रकरणी शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना अटक झाली आहे. एन रामकृष्ण या कंपनीच्या जुन्या चेकबुक पुस्तकातील 20 लाख रुपये रक्कमेचा चेक चोरून चंद्रकांत मैंगुरे यांनी बँकेच्या खात्यावरून 15 लाख 17 हजार दोनशे पाच रुपये काढून चोरी केली होती. याबाबत मधूकुमार राहणार हनुमान मंदिर जवळ यांनी मिरज शहर गांधी चौकी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या गुन्हा प्रकरणी चंद्रकांत मैंगुरे हे अटकपूर्व जमीन मिळविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने पोलिसांनी आज अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुनर्वसित गावांची वीज कापल्यानंतर गावकऱ्यांची ‘गांधीगीरी’

मातीच्या घराची भिंत कोसळली.. ५ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू