in

“आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ शिवसेना;”महागाईवरुन शिवसेनेचा टोला

‘पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ रोज नवनवे विक्रम करीत आहे. स्वयंपाकाचा गॅसदेखील या दरवाढीच्या शर्यतीत मागे नाही. पेट्रोलपाठोपाठ डिझेलनेही आता प्रति लिटरमागे शंभरी ओलांडली आहे. घरगुती गॅसचे दर मजल-दरमजल करीत एक हजार रुपयांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहेत. सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही आता बुधवारपासून वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांतील ही दुसरी आणि आठ महिन्यांतील पाचवी दरवाढ आहे. म्हणजे पेट्रोल-डिझेलप्रमाणे सीएनजी-पीएनजी गॅसच्या दरवाढीचे सत्रदेखील सुरूच आहे. इंधन दरवाढीमुळं बाजारात सर्वच वस्तूंचे दर काही महिन्यांपासून चढेच आहेत. सामान्य माणसाचं त्यामुळं कंबरडं मोडलं आहे आणि सरकार महागाई घटल्याचं सांगतंय. असं असेल तर मग बाजारात जी दरवाढ आणि महागाई दिसते आहे ते काय आहे?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

‘सामान्य माणूस महागाई आणि रोजच्या इंधन दरवाढीच्या वणव्यात होरपळत असताना केंद्र सरकार महागाई दरात घट झाली, खाद्य महागाई कमी झाली असे दावे करीत आहे. सगळी गंमतच सुरू आहे. आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, पण निदान महागाईची जुमलेबाजी तरी करू नका,’ असा सणसणीत टोला शिवसेनेनं मोदी सरकारला हाणला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर घटला आहे. ऑगस्टमध्ये हा दर ५.३ टक्के होता. आता तो ४.४५ टक्क्यांवर आला आहे. सरकारच्या ‘नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस’नं ही टक्केवारी जारी केली आहे. एप्रिल २०२१ नंतरचा हा सर्वात कमी दर आहे, असंही सांगण्यात आलं आहे. शिवाय खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत असाही सरकारचा दावा आहे. त्यामुळं खाद्य महागाई ३.११ टक्क्यांवरून ०.६८ टक्के एवढी घसरली आहे, असंही सरकारचं म्हणणं आहे. त्यावरून शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारला टोले लगावण्यात आले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मृतदेहाचा तब्बल 6 किमी प्रवास, पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

‘पीएम केअर फंडात जमा पैसा कुठे जातोय? ऑडिट रिपोर्ट कुठे आहे?’