गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई आणि परिसरात या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाविकास आघाडी सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न सुरु केले आहेत. नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. परिणामी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा ‘डायरो’ आणि गुजराती बांधवांचा मेळावा स्थगित करण्यात आला आहे.
कोरोनामुक्तीसाठी शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या गुजराती विभागातर्फे मुंबईमध्ये ‘जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपणा’ ही घोषणा देत एकापाठोपाठ एक असे दोन मेळावे प्रचंड प्रमाणात यशस्वी झाले. पहिला जलेबी फाफडा, दुसरा रासगरबा कमालीचा यशस्वी झाला. रविवार, 21 फेब्रुवारी 2021 रोजी ‘डायरो’ हा लोकप्रिय कार्यक्रम शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी आयोजित केला होता.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा आणि लोकप्रिय ‘डायरो’ हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याची माहिती हेमराज शाह यांनी दिली आहे. मुंबईमधील परिस्थिती निवळल्यानंतर हा कार्यक्रम दणदणीतपणे आयोजित करण्यात येईल, असेही हेमराज शाह यांनी आवर्जून नमूद केले आहे.
Comments
Loading…