in

नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द केल्याने शिवसेनेचा जल्लोष

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जातप्रमाणपत्र रद्द केलं आहे. तसंच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर आता नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे.त्यामुळे आज अमरावती शहरातील राजकमल चौकात शिवसेनेचे वतीने प्रचंड जल्लोष करत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

नक्की काय आहे प्रकरण ?
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव यांनी राणा यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. नवनीत राणा यांनी निवडणूक अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस आहे. त्यांनी जात प्रमाणपत्र समितीसमोरदेखील त्यांच्या जातीचा खोटा दावा केला आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता.त्यामुळे कोर्टात हा निकाल दिला,अमरावती जिल्हात शिवसेनेचे वतीने आज जल्लोष केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

५ वर्षाच्या चिमुकलीने नोंदवलं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव

Happy Birthday Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीचा बॉलिवूड ते आजपर्यंचा प्रवास पाहूयात!