टूलकिट प्रकरणात आता आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगू लागले आहेत. या प्रकरणात दिशा रवीनंतर आणखी दोन नविन नावे समोर आल्यानंतर आता शिवसेनचे यामध्ये कनेक्शन असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
शेतकरी आंदोलनावर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाईचं सत्र सुरु केले आहे. यामध्ये दिशा रवीनंतर आणखी दोन जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आल. यात मुंबईतील वकील निकीता जेकब यांच्याबरोबरच बीड जिल्ह्यातील असलेल्या शंतनू मुळूक यांचाही समावेश आहे.
या प्रकरणात अतुल भातखळकर म्हणाले आहेत, टूलकिट प्रकरणातील दिल्ली पोलिसांना हवा असलेला आरोपी शंतनू मुळूक हा शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूकचा चुलत भाऊ आहे. तसेच शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आता निर्लज्जपणे पर्यावरण कार्यकर्ता म्हणून भावाचे जोरदार समर्थन करत असल्याचे म्हणत त्यांनी ‘हे शिवसेना कनेक्शन बोलके’ असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच शिवसेनेने याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Comments
Loading…