in

दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक

मेऴघाट येथील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक केली आहे. दीपाली यांच्या आत्महत्येनंतर शिवकुमार बेपत्ता झाले होते, ते नागपूर मार्गे इतरत्र जाणार असल्याची माहिती अमरावती पोलिसांच्या हाती लागली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

गुगामल वन्य विभागात कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी काल आपल्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पाणी सुसाइड नोट लिहिली होती. त्याच्या आधारेच पोलिसांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक केली.

विनोद शिवकुमार हे शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे दीपाली यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिवकुमार यांनी कमीपणा दाखवण्यासाठी माझ्या कामात जाणीवपूर्वक चुका काढायचे. मी गर्भवती असताना मला सुट्टी नाकारून रस्त्यावर फिरवले, ज्यामुळे माझा गर्भपात झाला. ते मला अश्लील भाषेत बोलायचे. रात्रीच्या वेळी कुठेही भेटायला बोलवायचे. असे दीपाली यांनी या पत्रात म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भांडुपच्या ड्रीम्स मॉल आग प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू

Night Curfew | राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी