in

आदर्श भाडेकरू कायद्याला शिवसैनिकांचा विरोध…नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्र सरकारने लागू केलेल्या आदर्श भाडेकरू कायद्याला शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. यासंबंधी सेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

मागील आठवड्यात केंद्र सरकारने आदर्श भाडेकरू कायदा केला. नव्या कायद्यामुळे देशभरातील भाडेकरू आणि मालक यांच्यामधील करारांमध्ये बदल घडणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कायदा लागू करू नये, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.

या कायद्याची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेने त्याला विरोध दर्शवला होता. भाडेकरूंसह मालकांचेही नुकसान होऊ शकते, असा सून सेनेने लावला. यावरूनच आज शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. राज्यात आदर्श भाडेकरू कायदा लागू होऊ नये, यासाठी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये जुई नदीला पूर… महामार्गावरील वाहतूक ठप्प

Maharashtra Corona | दिवसभरात १६ हजार ३७९ रुग्ण कोरोनामुक्त