in

‘मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून नाचवले जात आहेत’

भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संतापलेल्या शिवसेनेने भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना भवनाशी पंगा घेण्याचे सोडाच; असा माणूस अद्याप जन्माला यायचा आहे. बाटगे आणि शिखंडींच्या टोळ्या हाताशी धरून मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या कोण टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय बेवड्यांचा चोख बंदोबस्त केल्याशिवाय राहाणार नाही! तरीही अंगावर यायचे असेल तर या; अर्थात तेवढी मर्दानगी अंगात असेल तर अशा शब्दांत शिवसेनेने जाहीर आव्हान दिलं आहे. सामना संपादकीयमधून शिवसेनेने भाजवावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. त्यांची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून हे स्पष्ट होते. मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शिवसेना भवनाकडे ज्या कोणी वाकडय़ा नजरेने पाहिले ते यच्चयावत नेते व त्यांचे पक्ष वरळीच्या गटारात वाहून गेले. ते पुन्हा कधीच कुणाला सापडू शकले नाहीत,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“शिवसेना भवन फोडू अशी भाषा भाजपमधील काही बाटग्या टिनपाट मंडळींनी करावी व व्यासपीठावरील मराठी पुढाऱ्यांनी त्यावर टाळ्या वाजवाव्यात ही महाराष्ट्र अस्मितेची गद्दारीच नाहीतर काय? शिवसेनेशी राजकीय मतभेद असणाऱ्या अनेकांनी शिवसेनेस वेळोवेळी आव्हाने दिली. शिवसेना त्या आव्हानांच्या छाताडावर चढून उभी राहिली, पण त्या राजकीय विरोधकांनीही कधी शिवसेना भवन फोडण्या-तोडण्याची भाषा केली नाही. जे स्थान मराठी जनांच्या हृदयात हुतात्मा स्मारकाचे आहे तीच प्रेरणा व भावना शिवसेना भवनाच्या बाबतीत सर्वच पक्षांतील मराठी लोकांत आहे,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“शिवसेना आहे म्हणूनच मुंबईत मराठी माणूस ताठ मानेने व कण्याने उभा आहे हीच त्या सगळय़ांची भावना आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत दादर मुक्कामी असलेल्या शिवसेना भवनाच्या दर्शनी भागी जसा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे तसा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचाही तेजस्वी पुतळा आहे. त्या भवनावर शिवरायांचा भगवा झेंडा डौलाने फडकत आहे. या भगव्या झेंडय़ाचा पोटशूळ काही मंडळींना उठल्यामुळेच शिवसेना भवन फोडण्याची मस्तवाल भाषा त्यांनी केली. खरेतर या मंडळींची दखल घ्यावी व त्या टिनपाटांवर इथे काही लिहिण्या-बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही. पुन्हा हे जे कोणी फोडा- झोडा याची भाषा करीत आहेत त्यांची लायकी फक्त चिंधीचोर दलालांची आहे. शिवसेना भवनाच्या आसपास मैलभर परिघात उभे राहण्याची यांची कुवत नाही. तेजस्वी सूर्यावर थुंकून लक्ष वेधून घेण्यापलीकडे यांचे कर्तृत्व नाही,” अशी टीका शिवसेनेने केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात पुन्हा लसीचा मोठा तुटवडा; 120 दिवस उलटूनही दुसरा डोस मिळेना

१६ कोटींच्या इंजेक्शनंतरही ‘त्या’ चिमुकलीचा मृत्यू